देशभरात ९ महिन्यांमध्‍ये 30 हजारांहून अधिक अमृत सरोवरांचे झाले लोकार्पण!

135

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात ‘मिशन अमृत सरोवर’या उपक्रमाचा 24 एप्रिल 2022 रोजी प्रारंभ झाला. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवरे बांधण्याचे किंवा असलेल्या सरोवरांचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेंतर्गत निश्चित करण्यात आले. या मोहिमेमध्‍ये 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 50,000 अमृत सरोवर बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहीम सुरू झाल्यापासून अवघ्या 9 महिन्यांच्या अल्प काळामध्‍ये 30,000 हून अधिक अमृत सरोवरे बांधण्यात आली आहेत. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 60 टक्के आहे.

( हेही वाचा : ट्विटरचा सर्व्हर डाऊन! फेसबुक-इन्स्टावरही अडचणी, युजर्स झाले हैराण)

६ केंद्रीय मंत्रालयांचे संयुक्तपणे काम 

यासाठी सहा केंद्रीय मंत्रालये संयुक्तपणे काम करीत आहेत. यामध्‍ये ग्रामीण विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय कार्यरत आहेत. तसेच तांत्रिक संस्था म्हणून, भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स (बीआयएसएजी-एन) आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारे एकत्रितपणे कार्यरत आहेत. या एकूण मिशनचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे मंत्रालय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांकडून सीमांकित अमृत सरोवर स्थानी उत्खनन केलेली माती, गाळ यांचा वापर परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केला जात आहे.

विविध सार्वजनिक आणि सीएसआर संस्थांनीही या मिशनमध्ये खूप रस दाखवला आहे आणि देशभरातील अनेक अमृत सरोवरांच्या बांधकाम/पुनरुज्जीवनात योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे मिशन अमृत सरोवर ग्रामीण जीवनमानाला चालना देत आहे. पूर्ण झालेले सरोवर सिंचन, मत्स्यपालन, बदक पालन, शिंगाड्याची लागवड आणि पशुसंवर्धन इत्यादी विविध उपक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहे. अमृत सरोवर मिशनचे उद्दिष्ट अमृत सरोवराची गुणात्मक अंमलबजावणी आणि स्थानिक सामुदायिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून विकास करणे तसेच अमृत सरोवर कार्यासाठी विविध मंत्रालयांनी संयुक्त कार्य करणे, हे सुद्धा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.