Kasba, Chinchwad By-Election:…तर तुमचा पराभव निश्चित समजा; मनसेच्या नेत्याचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

164

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवड या रिक्त झालेल्या जागेवर येत्या २६ जानेवारीला होत आहेत. या पोटनिवडणुकीवरून मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारची कानउघडणी करत आव्हान दिले आहे.

वसंत मोरे काय म्हणाले?

मनसे नेते वसंत मोरे यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे २ आमदार नुकतेच मयत झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामुळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहानुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार.’

(हेही वाचा – Kasba By Election: हिंदू महासंघाच्या उमेदवाराची मनसेला खुली ऑफर; म्हणाले, …तर एक आमदार वाढेल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.