‘मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’काळा घोडा कला महोत्सवात विविध भाषांमधील ३० चित्रपट

205

‘मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’ अंतर्गत ०४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधी दरम्यान सुरू असलेल्या ‘काळा घोडा कला महोत्सव २०२३’ ला मुंबई महानगरपालिकेचेही सहकार्य आहे. या अंतर्गत स्वतंत्र चित्रपट विभाग काळा घोडा कला उत्सवानिमित्त सुरू करण्यात आला आहे.

( हेही वाचा : बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचे लोकार्पण; मुंबई आणि ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार )

चित्रपटाचे माहेरघर असलेल्या मुंबईला सन २०१९ मध्ये ‘युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’ अंतर्गत ‘युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’चा दर्जा प्राप्त झालेला आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.

‘मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’ अंतर्गत आयोजीत केलेल्या चित्रपट विभागाच्या कार्यक्रमांची सुरुवात ही मुंबईतील विविध चित्रपट चित्रिकरण ठिकाणांची माहिती देणाऱ्या लघुपटाने आणि मुंबई शहरातील चित्रपट जगताचा इतिहास दर्शविणार्‍या लघुपटाने करण्यात आली. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका आयोजित ‘म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्ट’ अंर्तगत विजेत्या चित्रपटांचे सादरीकरण करण्यात आले अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास कक्षाच्या अधिकारी शशिबाला यांनी दिली आहे. याच नेटवर्कच्या ‘यमागटा क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’ शहराने सादर केलेल्या जपानी लघुपटाचे प्रदर्शन सुद्धा नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले. सदर आयोजनास उपस्थित असलेल्या रसिकांनी मुंबईच्या संस्कृतीचा समावेश असलेल्या म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्ट व जपानच्या गीशा संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या चित्रपटांचे भरभरून कौतूक केले.

मुंबई महानगरपालिकेच्या ‘काळा घोडा कला महोत्सव’ हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जाणारा नऊ दिवसांचा बहुविषयक महोत्सव आहे. दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी या महोत्सवात खाद्यपदार्थ, कला, रंगभूमी, साहित्य, नृत्य, चित्रपट आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

या वर्षी ‘मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’च्या अंर्तगत काळा घोडा कला महोत्सवाद्वारे चित्रपट विभागाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट विभागाच्या उद्घाटन मुंबई महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास विभागाद्वारे युनेस्कोच्या नामनिर्देश व त्याचे मुंबई शहराकरिता असलेले महत्त्व याबाबतची माहित उपस्थितांना देण्यात आली.यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये १२ फेब्रुवारीपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. मराठी चित्रपट स्थळपुराण, नेपाळी चित्रपट निमटोह, कॅन्टोनीज चित्रपट चुकिंग एक्सप्रेस आणि अग्रगण्य लेखक – निर्माते जोडी राज आणि डी. के. ह्यांच्या मास्टर क्लाससह अनेक भाषांमधील चित्रपटही या महोत्सवाच्या दरम्यान सादर करण्यात येणार आहेत.

‘मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’ व ‘काळा घोडा कला महोत्सव’ अंतर्गत काळा घोडा महोत्सवाच्या संकेत स्थळावर तसेच त्यांच्या समाज माध्यम खात्यांद्वारे कार्यक्रम आणि वेळेची सविस्तर यादी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईकरांनी या महोत्सवात सहभागी होऊन ‘मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म’ च्या नामनिर्देशनाची शोभा वाढवावी, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.