देशातून खोटेपणाचा कचरा साफ करायला हवा – राहुल गांधी

312

चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी “आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा असे म्हणत मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.

काय आहे ट्विटमध्ये

का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?” चीनच्या या कुरापतींचा उल्लेख वगळणं हा केवळ योगायोग नाही तर सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. जेव्हा केव्हा देश एखाद्या मुद्द्यावर भावनिक होतो तेव्हा फाईल्स गायब होतात. यामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा राफेलची फाईल असो,” असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.