अधिवेशनापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतील १० ते १५ आमदार फुटतील; बच्चू कडूंचा दावा

153

राज्यातल्या राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. अधिवेशनापूर्वी ठाकरे गट वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील १० ते १५ आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा बच्चू कडूंनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार अतिबहुमतात

आमदार बच्चू कडू म्हणाले की, मला असं वाटतं, सरकार जायचं काही कारण नाहीये. एकंदरीत पाहिलं तर, सरकार बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. २० ते २५ आमदार इकडं तिकडं झाले तरी सरकार मजबूतीनं पूर्ण उभं राहिलं. आणि पूर्ण वेळ सरकार काढेल. उलट आता अशी अवस्था आहे, जसं इतर पक्षातील काही आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतो. अधिवेशनापूर्वी ठाकरे गटा व्यतिरिक्त १० ते १५ आमदार पक्ष सोडतील.

काँग्रेसची धोक्याची घंटा

पुढे बच्चू कडू म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधीची एवढी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा गेली. त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाला? महाराष्ट्रातून काँग्रेस फुटीचे निकाल येऊ लागलेत. त्यामुळे आता काँग्रेसने चिंतन करण्याची गरज आहे कारण ही काँग्रेसची धोक्याची घंटा आहे.

(हेही वाचा – शिंदे गटाच्या शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील गाडीला अपघात: एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.