जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण, त्यांच्या वारसदारांना नेहरुंचे आडनाव लावण्यास का भीती वाटते? का नेहरू आडनाव लावण्यास लाज वाटते? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबांना विचारला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनपर प्रस्तावावर ते बोलत होते.
काही लोकांचा व्यवहार हा निराशजनक
कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केस उभे राहतात. आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिले गेले असेल. ते आम्ही ठिक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचे आडनाव लावण्यास का भीती वाटते? का नेहरुंचे आडनाव लावण्यास लाज वाटते? पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांनी ‘मोदी-अडाणी भाई-भाई’ अशा घोषणांनी संसद दणाणून सोडली. याचाही पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला. काही लोकांचा व्यवहार हा निराशजनक आहे. या सदस्यांना मी सांगू इच्छितो की, ‘जेवढा तुम्ही चिखल उडवणार, तेवढे कमळ उगवणार, असा टोमणा पंतप्रधानांनी विरोधकांना लगावला.
(हेही वाचा पंतप्रधानांचे ‘ते’ वक्तव्य खोटे ठरवण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न; FACT CHECK मधून पर्दाफाश)
Join Our WhatsApp Community