चिंचवडमध्ये मविआचे टेन्शन वाढले; कलाटे निवडणूक लढणार

172

कसबा आणि चिंचवड या दोन पोट निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटे उरली असताना चिंचवडमधून राहुल कलाटे या बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यात ठाकरे गटाला अपयश आल्याने आता इथे तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. या ठिकाणी एनसीपीकडून नाना काटे, भाजपाकडून अश्विनी जगताप हे निवडणूक लढणार आहेत.

या ठिकाणी कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.  कलाटे मविआची मते खाऊन भाजपच्या उमेदवाराचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसे पाहिल्यास चिंचवड आणि कसबा मतदारसंघात ठाकरे गटाला या आधी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संभाजी ब्रिगेडने कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. चिंचवडमधून प्रवीण कदम यांनी तर कसबा मतदारसंघातून अविनाश मोहिते यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी जाहीर केले. संभाजी ब्रिगेडने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांनी चर्चा केली होती.

(हेही वाचा तुर्की महिलेने मारली भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी; मदतीचा हात दर्शवते मानवतेची साथ)

राहुल कलाटे यांना विजयाचा विश्वास 

एकीकडे संभाजी ब्रिगेडने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे अद्यापही बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहुल कलाटे यांची मनधरणी सुरू होती. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ठाकरे गटाचा मविआसाठी त्रास बनला. आपण विजयी होणार असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.