मुंबई ते शिर्डी येथे वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून ही ट्रेन धावणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १३ हजार ५०० कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी दिले आहेत. आधीचे सरकार ५०० कोटी द्यायचे. पंतप्रधान मोदी यांनी ११ पटीने तरतूद वाढवली आहे. मुंबईसाठी २ हजार कोटी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनसाठीच्या समस्या सोडवल्या त्यामुळे बुलेट ट्रेनही धावणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून शिर्डी आणि सोलापूर या दोन ठिकाणी जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते. वंदे भारत ट्रेन स्वतःच अजूबा आहे. कुणीही अशी कल्पना केली नव्हती की भारतात अशी ट्रेन चालू शकेल. आजपासून ही ट्रेन मुंबईवरून शिर्डी येथे साई बाबा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी धावणार आहे, तर दुसरी ट्रेन सोलापुरात आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी धावणार आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी कोट्यवधींची तरतूद केली त्याबद्दल आभार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा ‘वंदे भारत’ ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थस्थळांचा विकास होणार; पंतप्रधान मोदींचा विश्वास)
Join Our WhatsApp Community