सोन्याच्या दातामुळे १६ वर्ष फरार असलेला आरोपी गजाआड

178

सोळा वर्षांपासून फरार असणाऱ्या एका आरोपीची त्याच्या सोन्याच्या दातावरून ओळख पटवून अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव गाव काहीच माहीत नसताना केवळ सोन्याच्या दातावरून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन
प्रवीण जडेजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रवीण जडेजा याला १६ वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर पडताच तो फरार झाला होता. स्वतःची ओळख लपवून तो गुजरातच्या कच्छ येथील एका गावात राहत होता. त्याने त्याचे नाव प्रवीण ऐवजी प्रविणसिंह उर्फ प्रदीप सिंह आसुभा जडेजा नावाने वास्तव्यास होता. १६ वर्षांपूर्वी प्रवीण जडेजा हा दादर हिंदमाता या ठिकाणी एका कापडाच्या दुकानात कामाला होता. त्या ठिकाणी त्याने मालकाची आर्थिक फसवणूक करून चोरी झाल्याचा बनाव रचला होता. मात्र त्याचा हा बनाव पोलिसांनी उघड करून त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाल्यावर त्याने कोणाला काही माहिती न देता फरार झाला होता, न्यायालयात तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. व त्याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र त्याचा कुठलाही थांगपत्ता लागत नव्हता तो कुठे राहतो कुठल्या नावाने राहतो याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती.

मात्र आरोपी प्रवीण जडेजा याचे पुढचे दोन दात सोन्याचे असून दोन्ही दातात फट पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खबरीची मदत घेत प्रवीण जडेजा हा गुजरात राज्यातील कच्छ येथे एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी प्रवीण जडेजा उर्फ प्रविणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा याची खात्री करून त्याला जीवनविमा पॉलिसी मॅच्युअड झाली असल्याच्या बहाण्याने मुंबईत बोलावून त्याला अटक करण्यात आली.

(हेही वाचा – खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्याने ‘स्पेशल २६’चा पोलीस आयुक्तांकडून सत्कार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.