Cow Hug Day : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गायीला अलिंगण देण्याचे आवाहन केंद्राने घेतले मागे

190
१४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गायला अलिंगन देण्याचे काऊ हग डे साजरा करण्याचे आवाहन देशाच्या पशु कल्याण मंडळाने केले होते, पण आता केंद्र सरकारने यापासून माघार घेतली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर मंडळाने आपले अपील मागे घेतले आहे.
जगभरात आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मात्र, भारतातील काही धार्मिक आणि सांस्कृतिक संघटना याला विरोध करत आहेत. इतकेच नाही तर अनेक संस्थांनी १४ फेब्रुवारीला आणखी काही दिवस साजरे करण्याचे आवाहनही केले आहे. कोणत्याही सरकारी संस्थेने असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ होती. यावरून वाद सुरू झाला. सोशल मीडियावरही लोक विविध मीम्स तयार करून या आदेशाची खिल्ली उडवत होते. याच दबावामुळे मंडळाने आपले अपील मागे घेतल्याचे मानले जात आहे. अपील मागे घेतल्याची माहिती बोर्डाचे सचिव एस.के.दत्ता यांनी दिली आहे. त्यांनी नोटीस जारी करून म्हटले आहे की, ‘दुग्ध व पशुसंवर्धन मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानंतर पशुसंवर्धन विभागाने गाय आलिंगन दिन साजरा करण्याचे आवाहन मागे घेत आहे. पशु कल्याण मंडळाकडून प्रथमच असे आवाहन करण्यात आले. जगभरातील माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.