९ वर्षांच्या मुलीला फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया या आजाराचे निदान झाला. हा एक दुर्मिळ पचनाशी निगडीत आजार आहे. या आजारामुळे मुलीला अत्यंत गुंतागुंतीच्या यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या मुलीच्या वडिलांनीच त्यांच्या शरिरातील यकृताचा काही भाग आपल्या मुलीला दान केला. वैद्यकीय शेत्रात अत्यंत अवघड समजली जाणारी ही शस्त्रक्रिया परळ येथील खासगी रुग्णालयात पार पडली.
फॅमिलीअल हायपर कोलेस्टेरोलेमियामुळे शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा बिघडते. रुग्णाच्या पचनप्रक्रियेवर परिणाम होत रुग्णाला दैनंदिन व्यवहार करण्यातही त्रास होऊ लागला. पचनात झालेला बिघाड तसेच कोलेस्ट्रोलची पातळी वाढल्याने तिला रक्तप्रवाहाचाही त्रास होऊ लागला. या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी नऊ महिन्यांपूर्वी तिला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरही पचनाच्या त्रासामुळे तिच्या शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी सतत वाढत राहिली. अखेरिस तिच्या यकृताच्या कार्यावर त्याचा परिणाम होऊ लागला. डॉक्टरांनी नऊ वर्षाच्या मुलीच्या पालकांना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सूचवली. पालकांनी परळ येथील खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यााचा निर्णय घेतला.
(हेही वाचा नाशिक ठरतेय वन्यजीवांच्या अवयवांच्या विक्रीचे ठिकाण)
मुलीच्या वडिलांनीच त्यांच्या शरीरातला यकृताचा भाग प्रत्यारोपणाासाठी देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर दहाव्या दिवशीच तिला डिस्चार्ज दिला गेला. शस्त्रक्रियेला आता दोन महिने पूर्ण झाल्यानंतर नऊ वर्षांची मुलगी आता शाळेत परत जायला सज्ज झाली आहे. तिला आता दैनंदिन व्यवहार करताना पचनाची कोणतीच समस्या उद्भवणार नाही. तिची कोलेस्ट्रोलची पातळी सर्वसामान्य झाली आहे. ती मित्रमैत्रिणींसोबत खेळू शकते, असेही डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community