गोव्यात समुद्रकिनारी मद्यपान केल्यास ५० हजार रुपये दंड, कार्निव्हलसाठी विशेष नियोजन!

196

कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा गोव्यात १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील नागरिक कार्निव्हलच्या तयारीला लागले आहेत. तसेच महोत्सवाची घोषणा होताच आता पर्यटकांनीही गोव्याची वाट धरली आहे. गोवा कार्निव्हल दरम्यान खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : हॉटेल, रेस्टॉरंटमधील मेनूमध्ये भरडधान्यांचा होणार समावेश! आंतरराष्ट्रीय ‘तृणधान्य’ वर्षानिमित्त विशेष उपक्रम)

विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • पणजी – १८ फेब्रुवारी
  • मडगाव – १९ फेब्रुवारी
  • म्हापसा – २० फेब्रुवारी
  • वास्को – २१ फेब्रुवारी

गोव्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले असून देश -विदेशातील सुमारे ६० ते ७० हजार पर्यटक हवाई मार्गे या कार्निव्हलसाठी गोव्यात दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलींचे पालन करणे सर्व पर्यटकांना बंधनकारक असणार आहे.

  • पर्यटकांसाठी गोवा कॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • गोव्याच्या सुमद्रकिनारी मद्यपान करण्यास आणि जेवण बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपये दंड वसून करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
  • पर्यटकांसाठी २४ तास हेल्पलाईन क्रमांर कार्यान्वित केला जाणार आहे. तसेच कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावरून गोव्यातील हॉटेल आणि खासगी गाड्यांसाठी आरक्षण करून आपली फसवणूक करून घेऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.