शिवजयंती उत्सवासाठी पहिल्यांदाच शिवजन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. १९ फेब्रुवारीला शासकीय सोहळा मोठ्या उत्साहत संपन्न होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयात निर्णय झाला असून यंदा पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरही शिवजयंती साजरी केली जात असल्याने मुख्यमंत्री शिंदे शिवनेरीहून थेट आग्र्याला सुद्धा जाणार आहेत.
शिवनेरीहून मुख्यमंत्री आग्र्याला जाणार?
दिल्ली उच्च न्यायालयात शिवप्रेमींना भक्कम बाजू मांडल्याने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याला परवानगी मिळालेली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, या सोहळ्यात जर महाराष्ट्र सरकार सहआयोजक होणार असेल, तर कार्यक्रम घेण्याचा विचार करता येईल. पण जर पुरातत्व खात्याने परवानगी दिली नाही, तर याचिकाकर्त्यांना पुन्हा न्यायालयात दाद मागता येईल. अर्थात सहआयोजन म्हणून महाराष्ट्र सरकारनेही तत्वत: मान्यता दिल्याने आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होताना तिथे आता सहआयोजक असलेल्या महाराष्ट्र सरकारचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर राहण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
Join Our WhatsApp Community