धूलिकण मोजणाऱ्या मशीनच्या साधनांचीच वांद्र्यात चोरी

173

ट्राफिक जंक्शनवर धूलिकण मोजण्यासाठी वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१६ साली ‘वायू’ नावाचे हवा शुद्धीकरण मशीन कार्यान्वित केले होते. पूलाखालील सिग्नलजवळ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. या मशीनवर नजीकच्या भिकाऱ्यांनी ओले कपडे वाळवण्याची जागा तयार केली. मशीनची साधने काही दिवसांतच चोरीला गेली. सरकारी यंत्रणेची चोरी झालेली असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिस तक्रार नोंदवली नाही. सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा लेखाजोगाच योग्य पद्धतीने सांभाळला जात नसल्याची बाब या प्रकरणामुळे उघडकीस आली. हे प्रकरण गेल्या सहा वर्षांपासून लपवण्यात आले.

( हेही वाचा : फक्त ९१ धावांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला केले ऑलआऊट! भारताचा मोठा विजय, मालिकेत आघाडी)

वांद्रे, सायन, घाटकोपर, भांडूप आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणातील ट्राफिक जंक्शनवर ६०.८३ लाख रुपये खर्च करुन वायू हवा शुद्धीकरण मशीन २०१६ साली कार्यान्वित करण्यात आले. या मशीन्सचा दोन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथे वायू मशीनच्या साधनांची चोरी झाली. ही चोरी पूलाखाली राहणा-या भिका-यांनीच केली, असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी केला. पाचही वायू केंद्राच्या देखरेखीची जबाबदारी आयआयटीला दिली गेली होती. वायू मशीनची साधने चोरीला गेल्याचे कळताच कंत्राटदार कंपनी आयआयटीने नवीन साधने मशीनला लावली. या स्वतंत्र केंद्रातील धूलिकणाच्या मोजमापातील अभ्यासात संपूर्ण माहिती अचूक आली नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र संबंधित प्रकरणी पोलिस तक्रार न करण्यामागील कारण सांगण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वायू प्रदूषणाचे संचालक डॉ. व्ही. मोटघरे यांनी नकार दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.