पत्रकार शशीकांत वारीसे मृत्यू प्रकरणाची चौकशी होईल आणि त्यातून काय ते समोर येईल, संजय राऊतांना कुणीही धमकी दिलेली नाही, राऊताच्या आरोपांना महत्त्व देत नाही, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
अडीच वर्षांत शिवसेने काय केले?
जे घडले आहे ते का घडले, कशामुळे घडले ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. संजय राऊतांची मी दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्राचे मोठे नेते नाही. बदनाम आहेत. सामना चालत नाही, म्हणून ते ब्रेकींग न्यूज टाकल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करतात, असेही नारायण राणे म्हणाले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिनाभराच्या आत मुंबईचे दोन दौरे झाल्याने विरोधकांकडून टीका, टिप्पणी सुरू आहे. यावरही नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही विकास केला आहे, मुल जन्माला घातली, नाव देण्याचा अधिकार कोणाला? वडिलांनाच ना? आमच्या विविध योजना महाराष्ट्रात आहेत. काल दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांना बोलावले, पैसे ते देतात. त्यात चुकीचे काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केले, हे त्यांनी सांगावे. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का?, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
(हेही वाचा आश्वासनानुसार सुविधा न पुरविणाऱ्या बिल्डरच्या विरोधात दाद मागण्याचा सदनिकाधारकाला अधिकार – सर्वोच्च न्यायालय)
पुण्यातील दोन्ही निवडणूक भाजप जिंकणार
याशिवाय कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना नारायण राणे यांनी कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार आहोत. विरोधक धुळीसारखे उडवणार आहोत. भाजपा ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो, असेही नारायण राणे म्हणाले. शिवसेनेने अडीच वर्षात काय केले? मातोश्रीसोडून अडीत तास तरी मंत्रालयात बसले का? अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आदित्य ठाकरेंचे नाव नका घेऊ, दिवसभर उपवास करावा लागेल, असेही नारायण राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community