पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील २० दौऱ्यात मुंबईच्या दौऱ्यावर आले, त्यावर विरोधकांनी टीका सुरु केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे दौरे होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले फडणवीस?
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असतील, तर येथील लोकांनी आनंद साजरा केला पाहिजे. कारण ते इकडे येताना, नेहमी काही ना काही घेऊन येतात. त्यामुळे जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाहीत, तेच लोक दुसऱ्यांवर टीका करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकच मिशन आहे, ते म्हणजे ‘मिशन इंडिया’ मिशन इंडियासाठी ते देशभरात फिरत असतात. ते मुंबईत दुसऱ्यांदा आले असतील, तर त्याचा आनंद साजरा केला पाहिजे. कारण ते येताना काहीतरी घेऊन येतात. आता पहिल्यांदाच एका राज्यात धावणाऱ्या दोन ‘वंदे भारत’ गाड्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. हा मान पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाला, असेही फडणवीस म्हणाले. त्यातील एक गाडी शिर्डीला जाणारी आहे. यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी अशा सगळ्या तीर्थक्षेत्राला आपण जोडणार आहोत. दुसरी गाडी सोलापूरला जाणारी आहे. ज्यामुळे पांडूरंग, तुळजा भवानी, सिद्धेश्वर आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेणे सुकर होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community