पुणे पोट निवडणुकीत बॅनरबाजी; आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा

172

पुण्यात सध्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.  कसबा, चिंचवड येथे दिलेल्या उमेदवारीमुळे भाजप आणि महाविकास आघाडी दोन्हींमध्ये नाराजी आहे. यात विशेष करून कसबाची निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. इथे ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही म्हणून चक्क पुणेरी भाषेत बॅनरबाजी सुरु झाली आहे.

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले होते. आता कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले आहे. कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात आता पुन्हा पोस्टर झळकला आहे.

(हेही वाचा Gita GPT: गुगल इंजिनियरने तयार केलं AI Chatbot गीता GPT; सोडवली जाणार तुमची प्रत्येक समस्या)

कसबा पेठ येथे भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पुणे कसबा पेठ मतदार संघातून टिळक परिवाराला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही. यामुळे पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा, आम्ही दाबणार NOTA’

कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे ब्राम्हण समाज संतप्त झाला आहे. यापुर्वी कसबा पेठेत बॅनर लावले होते. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.