कामगारांची शस्त्रक्रियागार सहाय्यक पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता आणि शस्त्रक्रिया विभागात किमान एक ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे, कामगारांनी आपले काम इमाने-इतबारे व अत्यंत प्रामाणिक करूनही व्यवसाय चाचणीत अनुत्तीर्ण करून एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध म्हणून सोमवारी, १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय या अन्यायग्रस्त कामगारांनी घेतलेला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लो. टी. म. स. रुग्णालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची भरती करताना सेवाजेष्ठ चतुर्थश्रेणी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबईचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी पात्र असलेल्या ३८ कमगारांची व्यवसाय चाचणी घेण्यात आली. यापैकी २३ कामगारांना पास केले तर १५ सेवाजेष्ठ कामगारांना नापास केले आहे, सेवाजेष्ठ कामगारांना डावलण्याचे षडयंत्र केले असल्याचे कामगार बोलत आहेत, तसे पत्रच कामगारांनी अधिष्ठाता २४ जानेवारी २०२३ रोजी दिलेले आहे. म्युनिसिपल मजदुर युनियन मुंबईने लो. टी. म. स. रुग्णालयाचे अधिष्ठाता सहित महापालिका आयुक्त या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे, आतापर्यंत आश्वासन व्यतिरिक्त पदरात काहीही पडलेले नाही.
(हेही वाचा पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा टोला; म्हणाले…
कामगारांची शत्रकियागार सहाय्यक पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता आणि शस्त्रक्रिया विभागात किमान एक ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे, कामगारांनी आपले काम इमाने, इतबारे व अत्यंत प्रामाणिक करून व्यवसाय चाचणीत अनुत्तीर्ण करून अन्याय केल्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अन्यायग्रस्त कामगारांचे प्रचंड चीड आणि नाराजी पसरलेली आहे. शस्त्रक्रिया विभागात या सर्व कामगारांनी काम करताना कधीही त्यांना विभागप्रमुख अथवा प्रशासनाच्या वतीने समज अथवा मेमो दिलेला नाही, मात्र कायम पदे भरीत असताना अनुत्तीर्ण (नापास) केल्यामुळे प्रशासनाच्या या कृतीबाबत सेवाज्येष्ठ कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जाणीवपूर्वक सेवाजेष्ठ कामगारांनाच व्यवसाय चाचणी परीक्षेमध्ये नापास करण्याचे नक्की कारण काय असू शकते, याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे, यामुळे असंख्य कामगार तसेच अन्य रुग्णालयातील कामगारांमध्ये शीव रुग्णालयातील प्रशासनाच्या विश्वासार्हते बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शस्त्रक्रिया विभागात या सर्वच कामगारांनी चांगले काम केल्यामुळे त्यांची कधीही छोटी/मोठी अशी कोणतीही तक्रार झालेली नाही, मात्र पदोन्नती देत असताना जाणीवपूर्वक या प्रामाणिक कामगारांवर व्यवसाय चाचणी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण करून प्रशासनाने अन्याय केल्यामुळे सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून न्याय मिळेपर्यंत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय या अन्यायग्रस्त कामगारांनी घेतलेला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न उपोषण आंदोलन करून करीत असल्याचे अन्यायग्रस्त कामगारांनी करण्याचा निर्णय घेतल्याचे म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबईचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी बोलतांना सांगितलेले आहे.
Join Our WhatsApp Community