दक्षिण आफ्रिकेत शनिवार, ११ फेब्रुवारीपासून महिला टी-२० वर्ल्डकपला सुरूवात झाली. यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत झाली. स्पर्धेला सुरूवात झाली असली तरी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीवर सर्वांची नजर आहे. भारतीय महिला संघ पहिली मॅच पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये १० संघ असून ही स्पर्धा १७ दिवस चालणार आहे. स्पर्धेतील १० संघांना २ गटात विभागण्यात आले आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत गट फेरीतील लढती होतील. या लढती भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० आणि रात्री १०.३० वाजता पाहता येतील. दोन्ही ग्रुपमधील टॉपचे २ संघ सेमीफायनलमध्ये जातील. २३ आणि २४ रोजी सेमीफायनलच्या लढती होतील. २६ तारखेला केप टाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर फायनल मॅच होणार आहे.
(हेही वाचा आश्वासनानुसार सुविधा न पुरविणाऱ्या बिल्डरच्या विरोधात दाद मागण्याचा सदनिकाधारकाला अधिकार – सर्वोच्च न्यायालय)
भारतीय संघ
स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन वर्ल्डकप विजेते संघ आहेत. सोबत पाकिस्तान आणि आयर्लंड देखील आहे. ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.
पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध
भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. केप टाउनमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता ही लढत होणार आहे. भारताची दुसरी लढत वेस्ट इंडिजविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी, १८ तारखेला इंग्लंडविरुद्ध तर अखेरची लढत १० तारखेला आयर्लंडविरुद्ध होईल.
Join Our WhatsApp Community