महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तसेच रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मागणी मान्य झाली असून अखेर भारताच्या राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि आता नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ‘पठाण’ विसरलात तरी चालेल पण सीमेवर ‘ठाण’ मांडून बसलेल्या जवानांना विसरु नका – स्वप्नील सावरकर)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
Join Our WhatsApp CommunityRamesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023