मुंबईतील प्रस्तावित २५ हवा शुद्धीकरण यंत्रांचा गाशा गुंडाळला

181

मुंबईतील ट्रॅफिक जंक्शनवरील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वायू हवा शुध्दीकरण यंत्र तब्बल २५ ठिकाणी लावण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा वर्षांपूर्वी जाहीर केला होता. पहिल्या टप्प्यातील गोंधळ तसेच निधीची जुळवाजुळव यात दुस-या टप्प्यात मुंबईत येणा-या २५ वायू यंत्रणांची घोषणा हवेतच विरली आहे, असे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे सूत्रांनी सांगितले.

air

पहिल्या टप्प्यातील वायू हवा शुद्धीकरण यंत्रणेच्या मशीन्स वापरल्यानंतर त्या ट्रॅफिक जंक्शनवरुन काढल्या गेल्या. पाचही मशीन्स सद्यस्थितीत कुठे आहेत, याबाबत कोणालाही कल्पना नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वायू प्रदूषणाचे संचालक डॉ. व्ही.मोटघरे यांना संपर्क केला असला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकल्पात सहभागी आयआयटीला पहिल्या टप्प्यातील ५ वायू शुद्धीकरण मशीन्सच्या देखरेखीचे आणि अभ्यासाचे काम दिले होते. आयआयटीला अखेरपर्यंत शेवटच्या टप्प्यातील निधीही पोहोचला की नाही, याबाबतही साशंकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(हेही वाचा हिंदूंनो, मुसलमानांचे आर्थिक आक्रमण ओळखा आणि रस्त्यावरचे व्यवसाय ताब्यात घ्या; रणजित सावरकर यांचे आवाहन)

२०१६ साली मुंबईत पाच ठिकाणी वायू हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले. वायू हवा शुद्धीकरण यंत्रांची दुरुस्ती तसेच वांद्रे येथील कलानगर जंक्शनवरील यंत्रणेच्या साधनांची चोरी या प्रकरणांमुळे दोन वर्षांचा हवा शुध्दीकरण प्रकल्पाबाबत आता नेमकी कोणतीच स्पष्टता येत नाही. २०१८ च्या अखेरीस भांडूप आणि घाटकोपर येथील वायू मशीन्ससह वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथील वायू मशीनही अखेरिस काढण्यात आली. सायन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील केंद्रे मात्र बराच काळ कार्यान्वित ठेवली गेली. या केंद्राची मोजणी मात्र बंद झाली होती. पुढील आदेश येत नसल्याने अखेरिस आम्ही या मशीन्स बंद केल्या, असे आयआयटीचे अधिकारी सांगतात. एकंदरितच हवा शुद्धीकरण यंत्रणेच्या देखरेखीत आणि वापराबाबत माहितीचा अभाव, तसेच एकमेकांवर दोषारोप सुरू असणे यामुळे ही यंत्रणा मुंबईत पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, मानखुर्द, कलानगर जंक्शन आणि हाजी अली या सर्वाधिक गर्दीच्या जंक्शनवर हवा शुध्दीकरण यंत्र बसवणार आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची २५ हवा शुद्धीकरण यंत्रणा पाच वर्षांपूर्वीच कार्यान्वित झाली असती तर आता ट्राफिक जंक्शनवरील हवा प्रदूषणात बदल दिसून आला असता असेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

हवा शुध्दीकरण यंत्राचे महत्त्व

ट्राफिक जंक्शनवर वाहनांमधील इंधन सतत जळत असल्याने धूलिकणांची मात्रा प्रचंड प्रमाणात साठते. ट्रॅफिक जंक्शनपुरत्या मर्यादित जागेत सूक्ष्म धूलिकणही मोठ्या प्रमाणात साचतात. हवा शुद्धीकरण यंत्रणेच्या दोन वर्षांच्या अभ्यासात ट्रॅफिक जंक्शनवरील धूलिकण १० ते २० टक्के मशीन्स खेचले जात असल्याचे दिसून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.