भगतसिंह कोश्यारी यांनी शेवटच्या क्षणीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. मात्र, जाता जाता त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रातील लोकं आमच्या पहाडी लोकांसारखी सज्जन आहेत मात्र शहरात गुंडगिरी करणारी काही दाऊदसारखी लोकं आहेत, असे विधान भगतसिंह कोश्यारींनी केले आहे. उत्तराखंडमधल्या नागरिकांच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती, त्यात ते बोलत होते.
( हेही वाचा: शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही फूट? )
कोश्यारी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त केले. महाराष्ट्राचे लोक आमच्या पहाडी लोकांसारखे चांगले आहेत. पण शहरात काही गुंडगिरी करणारे दाऊदसारखे लोक असतात, असे कोश्यारी म्हणाले. मी मराठी वाचतो. तर मराठी आणि पहाडी भाषेचे अनेक शब्द मिळते जुळते आहेत. आमच्याकडे पांडे आहे इकडे देशपांडे आहेत. इथे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत, असे कोश्यारी म्हणाले.
राज्यपाल पदावरुन पायउतार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरुन पायउतार झाले आहेत. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला आहे.
Join Our WhatsApp Community