रेल्वे इंजिनच्या धडकेत 4 मजुरांचा मृत्यू

134

रेल्वे इंजिनाने दिलेल्या धडकेत 4 रेल्वे मजुरांचा (गँगमन) मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. मदत आणि बचावकार्य उशिरा सुरू झाले. दरम्यान, यामुळे मुंबई मनमाड रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे.

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी पहाटे 5.44 वाजेच्या दरम्यान टॉवर डायव्हर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. पोल नंबर 15 ते 17 मध्ये ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना 4 मेंटेनन्स कर्मचाऱ्यांना रेल्वे लाईनचे मेंटनेस करणाऱ्या टॉवरने धडक दिल्याने त्यांना जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व लासलगाव येथील मजूर आहेत. मृतकांमध्ये संतोष भाऊराव केदारे (वय 38), दिनेश सहादु दराडे (वय 35), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38) यांचा समावेश आहे. हे सर्व जण ट्रॅक मेंटेनर असून लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना रुग्णालयात आणले असता लासलगाव डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत घोषित केले. घटनेनंतर चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी लासलगाव परिसरामध्ये जोरदार आक्रोश केला. घटना समजताच लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उप उपनिरीक्षक गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

( हेही वाचा: काही लोक ‘दाऊद’सारखी; भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.