तुर्की आणि सिरीयाच्या विनाशकारी भूकंपामुळे हाहाकार माजलेला असतानाच सिक्कीममध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 4.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी रविवारीआसामच्या नागावमध्ये 4.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दुपारी 4.18 वाजता 10 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. बांगलादेश, भारत आणि भूतानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. गुजरातच्या सुरत जिल्ह्यात 3.8रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याच्या 48 तासांत दोन्ही भूकंप झाले. इन्स्टिट्यूट ऑफसिस्मॉलॉजिकल रिसर्चने (आयएसआर) सांगितले की, शनिवारी दुपारी 12.52 वाजता सूरतच्या पश्चिम दक्षिणेकडे सुमारे 27 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. सध्या तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 33 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
( हेही वाचा: रेल्वे इंजिनच्या धडकेत 4 मजुरांचा मृत्यू )
Join Our WhatsApp Community