केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे भाष्य केले आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रस्त्यांवर दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, असे म्हटले आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ई- मोबिलीटीमध्ये मोठी क्षमता आहे आणि गुंतवणूकदारांनी पर्यावरण वाचण्यासाठी या क्षेत्रात येऊन गुंतवणूक केली पाहिजे. 2030 पर्यंत भारतात सुमारे दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, असेही गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांमुळे केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही तर रोजगार निर्मितीलाही मदत होईल, ज्याचा परिणाम देशाच्या विकासावर होईल आणि भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
( हेही वाचा: तुरुंगात आलेली ऑफर मी नाकारली, नाहीतर… अनिल देशमुखांचा मोठा खुलासा )