Malad Fire: मालाड येथील झोपडपट्टीला भीषण आग; एका मुलाचा मृत्यू

188

मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. मालाड भागात कुरार व्हिलेज परिसरात झोपडपट्टीला ही आग लागली आहे. जवळपास 50 ते 70 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. मालाड येथील आगीत एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

( हेही वाचा: नाशिक म्हसरुळ परिसरातील वनराईत भीषण आग; वनराई खाक )

आग नियंत्रणात 

मुंबईतील मालाड परिसरामध्ये कुरार झोपडपट्टीला आग लागली तो परिसर दाटीवाटीचा आहे. झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.