युती तोडण्याला उद्धव ठाकरेंचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम जबाबदार; बावनकुळेंचे टीकास्त्र

138

काॅंग्रेसची विचारधारा स्वीकारुन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली. त्यामुळे युती तोडण्याला जबाबदार हे फक्त उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्रप्रेम आहे. वीर सावरकरांचा अपमान होत असताना, सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली, आता हिंदुत्वावार बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना म्हटले.

काय म्हणाले बावनकुळे ?

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून पाठीत खंजीर खुपसला. आता मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे. माझी चूक झाली हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. पण आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे. अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.

निवडणुका या लागणारच आहेत, त्या कोणाच्या हातात नाहीत. 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुका लागणार आहेत. आम्ही निवडणुकांना घाबरत नाहीत, मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू, उद्धव ठाकरे यांच्या गरळ ओकण्याला जनता धडा शिकवेल, केव्हाही निवडणुका होऊ द्या आम्ही तयार आहोत, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगेंना अटक; काय आहे प्रकरण? )

न्यायालयाच्या निकालावर कोणीही बोलू नये, जो निकाल येईल तो मान्य करायला हवा. ठाकरे गटाचे लोक न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला तर योग्य आणि नाही लागला तर टीका करायला सुरुवात करतात, असेही बावनकुळे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.