महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी मुंबईत लिलाव प्रक्रिया सुरू आहे. या लीगमध्ये एकूण ५ संघ असतील. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश आहे. वुमन्स लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत ४६६९.९९ कोटी इतकी झाली आहे.
( हेही वाचा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेत महत्त्वाचा बदल! तिसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले)
महिला IPL संघ
- अहमदाबाद – १२८९ कोटी – अदानी स्पोर्ट्सलाइन
- मुंबई – ९१२.९९ कोटी – इंडिया विन स्पोट्सलाइन
- बंगलोर – ९०१ कोटी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- दिल्ली – ८१० कोटी – JSW GMR क्रिकेट
- लखनौ – ७५७ कोटी – कॅपरी ग्लोबल होल्डिंग्स
पहिल्या सेटमध्ये सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), सोफी एक्लेटन (इंग्लंड), अॅशलेह गार्डनर ( ऑस्ट्रेलिया ), हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना ( भारत), हॅली मॅथ्यू ( वेस्ट इंडिज), एलिसे पेरी ( ऑस्ट्रेलिया) यांच्यावर बोली लागणार आहे. स्मृती मानधनाचे नाव येताच मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी यांनी पॅडल उचलला त्यानंतर रॉयस चॅलेंजर्स बंगलोरने बोली लावण्यास सुरूवात केली. २.६० कोटी पर्यंत होन्ही फ्रॅंचायझींमध्ये चुरस रंगली. अखेर स्मृतीला RCB ने ३.४० कोटींमध्ये ताफ्यात घेतले.
प्रमुख महिला खेळाडू
- स्मृती मंधाना- ३.४ कोटी – रॉयस चॅलेंजर्स बंगलोर
- हरमनप्रीत कौर – १.८ कोटी – मुंबई इंडियन्स
- सोफी डिव्हाईन – ५० लाख – रॉयस चॅलेंजर्स बंगलोर
- अॅशलेह गार्डनर – ३.२ कोटी – गुजरात जायंट्स
- एलिस पेरीला – १.७ कोटी – रॉयस चॅलेंजर्स बंगलोर
- सोफी एक्लेस्टोन – १.८ कोटी – युपी वॉरियर्स
- दिप्ती शर्मा – २.६ कोटी – युपी वॉरियर्स