महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम मार्चमध्ये सुरू होणार आहे. या लिलावामध्ये एकूण ४०९ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. यासाठी १ हजार ५२५ खेळाडूंनी नोंदणी केली होती, परंतु ४०९ खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम ४ ते २६ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी भारताची स्टार खेळाडू स्मृती मंधानावर आतापर्यंत सर्वाधिक बोली लागली आहे. RCBच्या संघात आल्यावर स्मृतीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘नमस्कार बंगळुरू’ अशा शब्दांत स्मृतीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : स्मृती मंधाना ३.४ कोटींमध्ये RCB च्या ताफ्यात! हरमनप्रीत, दिप्ती शर्मासह महत्त्वाच्या खेळाडूंची स्थिती काय? )
या लिलावात प्रत्येक फ्रॅंचायझी खेळाडूंवर १२ कोटी रुपये खर्च करू शकते. किमान १५ आणि जास्तीत जास्त १८ खेळाडूंना खरेदी करण्याची मुभा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स आणि रेणुका सिंग ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह लिलावाच्या रिंगणात होत्या.
स्मृतीवर कोटींचा वर्षाव
लिलावादरम्यान भारतीय महिला संघाचा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृतीला RCBने ताफ्यात समाविष्ट केल्यावर तिला झालेला आनंद आणि सहकारी खेळाडूंनी केलेले तिचे कौतुक याचा हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी शेअर करत आहेत. RCBने संघात घेतल्यावर संपूर्ण फ्रॅंचायझीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Join Our WhatsApp CommunityWhat a video – celebration from Smriti Mandhana and team India was wholesome. pic.twitter.com/IXBs99houA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 13, 2023