मला जेलमध्ये टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंची मूकसंमती होती; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

152
मला जेलमध्ये टाकण्याची पोलीस आयुक्तांची हिंमत होऊ शकत नाही गृहमंत्र्यांचे आदेश असू शकत नाही, एक गृहमंत्री जेलमध्ये होते, तर दुसरा गृहमंत्री असे करेल असे वाटत नाही. तो आदेश वरून होता, पक्षाच्या नेत्यांकडून होता की मुख्यमंत्र्यांकडून होते माहित नव्हते, पण त्यांची सर्व माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माहित होती, त्याला त्यांची मूकसंमती होती, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

खोटे पुरावे तयार केले होते

अनेक प्रयत्न करूनही मला जेलमध्ये टाकू शकले नसते, तेवढी त्यांची हिंमतही नाही किंवा तसे काही मी केलेही नाही. पण त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. खोटे पुरावे तयार केले होते, कागदपत्रे बनवले होते, मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली होती, पण मी ५ वर्षे गृहमंत्री होतो, गृहखात्याशी माझे संबंध आहे. मी कधी पैसे खाऊन बदल्या केल्या नाही, कुणाला अपमानित केले नाही, त्यामुळे मोठ्या अधिकारी यांच्यात माझ्याविषयी चांगल्या भावना आहेत, म्हणून ते जे काही प्रयत्न करायचे ते मला आधीच समजायचे त्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाही. त्यांनी खोट्या जबाण्या घेतल्या, पण कुणी अधिकारी दबावाला बळी पडला नाही, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.