पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांचा मृत्यू

122

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात जाणा-या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या १७ महिलांना धडक दिली. यात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये १२ महिलाही जखमी झाल्या आहेत.

जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर येत आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या सर्व महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

( हेही वाचा: गुगल इंडियाच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी; हैद्राबाद येथून एकाला अटक )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.