महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणूकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. या शपथविधीबाबत अनेक गूढ अजून कायम आहेत. याबाबत दोन्ही नेते मौन बाळगून होते. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करुन झाल्याचे सांगत, गौप्यस्फोट केला. शिवाय पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार काही बोलले तर मी आणखी गौप्यस्फोट करेन, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून ऑफर आली होती आम्हाला स्थिर सरकार हवे आहे, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी ठरल्या होत्या. पण या सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे सर्वांनी पाहिले आहे.
( हेही वाचा: मला जेलमध्ये टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंची मूकसंमती होती; देवेंद्र फडणवीसांचा आरोप )
…..अन् अजित पवार तोंडघशी पडले
अजति पवांरांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, सगळे ठरल्यानंतर ते कसे तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील, असे फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community