शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला

120

जागतिर बाजार पेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या दुस-या व्यवहाराच्या दिवळी, सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 60600 वर उघडला आणि निफ्टी 4 अंकांनी मजबूत होऊन 17800 च्या पातळीवर गेला. आयटी आणि मेटल शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात वधारत आहेत. युपीएल आणि इन्फोसिस निफ्टी समभागांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते. यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. अपोलो हाॅस्पिटलच्या शेअर्समध्ये एक टक्का घट आहे.

( हेही वाचा: फेब्रुवारीत मार्च हिटचा अनुभव; जाणून घ्या पुढील सात दिवसाच्या कमाल तापमानाचा अंदाज )

कशी झाली सुरुवात?

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 118.41 अंकांनी म्हणजे 0.20 टक्क्यांच्या वाढीनंतर 60 हजार 550 वर उघडला. याशिवाय एनएसई चा निफ्टी 69.45 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17 हजार 840 वर व्यवहार करत आहे.

बॅंक निफ्टी तेजीत

मंगळवारी बॅंक निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. बॅंक निफ्टी 0.24 टक्क्यांच्या वाढीनंतर 41 हजार 300 वर पोहोचला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.