आता परदेशात पैसे पाठवणं झालं सोपं; काय आहेत नवीन फीचर्स?

117

भारतीय वापरकर्त्यांना पूर्वी परदेशात पैसे पाठवायला थोडी अडचण व्हायची. भारतीय वापरकर्त्यांना रोख किंवा फॉरेक्स कार्डद्वारे परकीय चलनाचा वापर करता येत होता. आता यात सुलभता प्राप्त होणार आहे. आता PhonePe ने UPI इंटरनॅशनल अंतर्गत क्रॉस बॉर्डर UPI पेमेंटसाठी सपोर्ट सुरू केला आहे. यामुळे परदेशात पैसे पाठवणे सोपे होणार आहे.

अॅपचे वापरकर्ते आता त्यांच्या भारतीय बँक खात्यांचा वापर करत संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, नेपाळ आणि भूतानमधील व्यापारी आउटलेटवर पेमेंट करू शकतात. वापरकर्ते आता आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड्सप्रमाणेच थेट त्यांच्या बँक खात्यातून विदेशी चलन पेमेंट करू शकतील.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या क्रॉस-बॉर्डर शाखा द्वारे UPI इंटरनॅशनल सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे परदेशात भारतीय डायस्पोरासाठी UPI व्यवहार सुलभ होऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतात येणा-या सर्व प्रवाशांना देशात राहत असताना त्यांच्या व्यापारी पेमेंटसाठी UPI वापरण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

( हेही वाचा: डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयाचा उफराटा न्याय; ओपीडी बंद असल्याचे सांगत रुग्णाला तपासण्यास नकार )

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, ’UPI साठी भारत आधीपासूनच जवळपास ३० देशांसोबत चर्चा करत आहे.’ ही भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे. महत्वाचं म्हणजे डिसेंबर २०२२ पासून एनसीपीआय च्या डेटानुसार फोनपे ने ६.३९ आख कोटी रुपयांच्या ३६७.४२ कोटी व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे. त्यामुळे सरकार या बाबतीत सकारात्मक पावले उचलणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.