रशिया युक्रेनच्या युद्धाला आता अकरा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेलं हे यु्द्ध अजूनही सुरुच आहे. रशियासारख्या बलाढ्य देशासमोर युक्रेनचा पाडाव होईल, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण, तसे झाले नाही. युक्रेनने रशियाला जशासतसे उत्तर दिले आणि अजूनही युक्रेन प्रतिकार करत आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच, दोन्ही देशांची मोठ्या प्रमाणात हानीदेखील झाली आहे. हे युद्ध आता कधी थांबणार याबाबत सांगणे कठीण आहे. रशिया युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण होत असताना, आपण एका अशा युद्धाबद्दल जाणून घेऊया जे 600 हून अधिक वर्षे चालले.
एक राज्य होते बायझेन्टाईन. रोमन साम्राज्याचा पश्चिम भागातील एक तुकडा. प्राचीन ग्रीक वसाहत बायझेनटीयमवरुन याचे नाव बायझेन्टाईन असे पडले. या राज्याची राजधानी होती काॅन्सटॅंटीनोपल.
बल्जेरीया आणि बायझेन्टाईन यांच्यात वारंवार लढाया होत असत. जवळपास 675 वर्षे या चकमकी सुरुच होत्या. ही युद्धे अत्यंत क्रूरपणे लढली जात. या युद्धाचे कसलेही नियम नव्हते. शत्रूला झोडपून संपवणे हे एकमेव ध्येय ठेवूनच ते युद्धाला सुरुवात करत.
आताच इस्तंबूल म्हणजे त्यावेळचे काॅन्सटॅंटीनोपल. इतिहास सांगतो की, बायझेन्टाईनचे राजे अत्यंत हूशार होते. पूर्वेला आपले राज्य कसे पसरवायचे हे त्यांच्या पक्के डोक्यात होते. 1453 पर्यंत त्यांनी पूर्व आणि दक्षिण युरोपमधील बराच भाग काबीज केला. या दरम्यान त्यांनी भयंकर युद्धे केली. बल्गेरियाला या युद्धांदरम्यान बायझेन्टाईनने धूळ चारली. बल्गेरियाचा राजा सॅम्युअल स्वत: युद्धात उतरला. त्याची फौज होती केवळ 15 हजार सैनिकांची आणि बायझेन्टाईनकडील सैनिक होते 45 हजार. त्यामुळे हे युद्ध बल्गेरिया सैन्याचे हत्याकांड करणारे ठरले. बल्गेरियाचा पराभव झाला आणि सैन्य बंदी बनवले आणि त्या सर्व सैनिकांना भयंकर शिक्षा सुनावली गेली.
या घोर यु्द्धानंतर आणि भयंकर शिक्षेनंतर बल्गेरिया परत कधीही युद्धासाठी उभा राहू शकला नाही. बल्गेरियाची सारी कुमक खिळखिळी होऊन गेली. ही बल्गेरियाच्या अंताची सुरुवात ठरली. याचा राग बल्गेरियाच्या जनतेने कायम मनात ठेवला. इतर छोट्या छोट्या राज्यांच्या मदतीने बल्गेरियाने शेवटी 1018 साली बायझेन्टाईनचे अस्तित्व बल्गेरियाने संपवले. सहाशे वर्षे बल्गेरिया आणि बायझेन्टाईन या राज्यांत इतकी युद्धे झाली की, या दोन्ही राज्यांचा नामशेष झाला.
Join Our WhatsApp Community