उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि हुशार आहेत, यात काहीच वाद नाही. कुठे, काय आणि कधी बोलायचे हे त्यांना चांगलेच समजते. त्यामुळे ते अशी वक्तव्ये वेळ साधून करतात, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, या फडणवीसांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांनी उपरोक्त निरीक्षण नोंदवले. मात्र शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे दोन दिवसाच्या सरकारसाठी ते पाठिंबा देतील यावर विश्वास बसण्यासारखा नाही, अशी पुस्तीही चव्हाण यांनी जोडली. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा उचलण्यासाठी या सगळ्या विषयाची चर्चा होत असल्याचे ते म्हणाले. बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयात इन्कम टॅक्सने हाती घेतलेल्या सर्च ऑपरेशनवर काही आक्षेप नाही. पण लोकशाही असलेल्या देशात माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. आजचे प्रकरण हे सर्च पुरते दिसते. त्यामुळे पुढे काही निघाले तरच यावर बोलता येईल, असे चव्हाण म्हणाले.
Join Our WhatsApp Community