शेत जमिनीत रानटी कुत्रा फाश्यात अडकून ठार

197

सोमवारी नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी येथील जंगलाला लागून असलेल्या शेत जमिनीत रानटी कुत्रा फाश्यात अडकून मेल्याचे वनाधिका-यांना आढळले. वन विभागाने विशेष व्याघ्र संरक्षण दलासह जंगलातील फासे काढण्यासाठी मोहीम हाती घेतली असता पथराई गावातील खासगी सर्व्हे नंबर २६१ मध्ये फाश्यात जंगली कुत्र्याचा मृतदेह आढळला.

या प्रकरणी वनाधिका-यांनी शेताच्या मालकाला अटक केली. रानटी कुत्र्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. न्यायवैद्यक विश्लेषणासाठी त्यांनी व्हिसेरा लावण्यात आली. मंगळवारीही शेतात वनाधिका-यांना अजून एक सापळा सापडला. रानटी कुत्रा हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षित असल्याने या प्रकरणी आरोपीवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालिका ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश परब, पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे टीम पुढील तपास करत आहे.

(हेही वाचा तुर्कीनंतर आता भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन; काय म्हणतो फ्रँक हूगरबीट्स? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.