दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विशेष प्रयत्नातून तरुणाईचे आकर्षण ठरलेला सेल्फी पॉईंट पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटला याआधी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा सेल्फी पॉईंट शिवतीर्थच नाही तर भारतभर प्रसिद्ध झाला, तोच सेल्फी पॉईंट नव्या स्वरूपात पुन्हा उभारण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या हस्ते झाले उदघाटन
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी, १४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. याठिकाणी प्रेमाचे प्रतीक असलेल्या बदामाच्या प्रतिमेवर दादर परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, सिद्धिविनायक मंदिर, उद्यान गणेश मंदिर, स्वामी समर्थ मंदिर अशा ठिकाणांचे लावलेले फोटो विशेष लक्ष वेधत आहेत. काहींवर वैभवशाली दादर, आपली मुंबई, आय लव्ह दादर असे संदेश लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे हा सेल्फी पॉईंट सर्वसामान्य नागरिकांचे आकर्षणाचा केंद्र बनला आहे.
Join Our WhatsApp Community