महिलांनो संवेदनशील भागांतील केस वॅक्सिंगने काढण्यापूर्वी घ्या काळजी

129

बिकनी परिधान करण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये वॅक्सिंगची मागणी महिला वर्गातून वाढू लागली आहे. मात्र संवेदनशील भागांत वॅक्स करुन केस काढताना जखम होणे, रक्तस्त्राव होणे अशा तक्रारी आता वाढत आहेत. विशेषतः लग्नापूर्वीही महिला आता वॅक्सिंग करुन केस काढायला प्राधान्य देत आहेत. या प्रकरणांमुळे जखमा, संसर्ग तसेच जळजळणे आदी तक्रारी दिसून येत असल्याच्ये स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच त्वचा रोगतज्ज्ञ सांगतात.

संवेदनशील भागांत ब्लेडचा वापर करुन रक्त आल्याच्या असंख्य तक्रारी सरकारी रुग्णालयांत येतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या खासगी क्लिनिकमध्ये वॅक्सिंगच्या वापराने होणारे त्वचारोग आणि जखमा अशा दोन्ही तक्रारी घेऊन तरुणींचा वर्ग मोठ्या प्रमाणात येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवले जात आहेत. पनवेलच्या आशीर्वाद क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर विशाखा म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना पिग्मेंटेशन, फंगल संसर्ग आणि जळजळण्याच्या तक्रारी वॅक्सिंगच्या वापराने दिसून येतात. कित्येकदा फंगल संसर्गासाठी तीन ते सहा महिने उपचार घ्यावे लागतात. कित्येकदा उपचारांचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त असतो.

( हेही वाचा: सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDCतील रबर कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ५०हून अधिक गाड्या घटनास्थळी )

संवेदनशील भागांत संसर्गाची बाधा होऊ नये. योनीमार्गाच्या संरक्षणासाठी निसर्गतःच केस उगवतात. केसांना सातत्याने काढणे हा उचित पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वॅक्सिंग करणे हे कित्येकदा घातकच ठरते. त्यामुळे निसर्गतःच योनीमार्गाचे संरक्षण करण्यासाठी केस मूळासकट काढू नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.