कोईम्बटूर स्फोट प्रकरणी एनआयएची तीन राज्यात ६० ठिकाणी छापेमारी

163

तामिळनाडूतील कोईम्बटूर येथे झालेल्या कार स्फोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तीन राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. एजन्सीने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या ६०हून अधिक ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या आहेत.

कोईम्बटूर येथे २३ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी एका कारमध्ये स्फोट झाला होता. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेत स्फोटाचा मास्टरमाइंड मुबीन (२९) मारला गेला होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात ६ जणांना अटक केली होती. हे सर्वजण कोईम्बटूर येथील रहिवासी होते. एनआयएनुसार, दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अनेक महिन्यांपासून कट रचला होता. यामध्ये महंमद अझरुद्दीन (२३), अफसर खान (२८), मोहम्मद थल्हा (२५), मोहम्मद रियास (२७), फिरोज इस्माईल (२७) आणि मोहम्मद नवाज इस्माईल (२५) यांचा समावेश आहे.

एनआयएने आरोपींकडून पोटॅशियमसह १०९ वस्तू जप्त केल्या होत्या. त्यात पोटॅशियम नायट्रेट, सल्फर, ब्लॅक पावडर, सुमारे दोन मीटर लांबीचा मॅकक्रॅकन फ्यूज, नायट्रो ग्लिसरीन, लाल फॉस्फरस, पीआरएन पावडर, ऍल्युमिनियम पावडर, ऑक्सिजन कॅनिस्टर, ९ व्होल्ट बॅटरी क्लिप, वायर, लोखंडी खिळे, स्विच, गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडरमध्ये पॅकिंग टेप, हातमोजे, इस्लामिक विचारसरणीचे तपशील आणि जिहादचे तपशील असलेल्या नोटबुक आदी जप्त करण्यात आले होते.

(हेही वाचा – दिल्लीत घडले आणखी एक श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.