लग्न लावायचं गंगूशी अन् संसार करायचा सावत्रीशी; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

146

महाराष्ट्र विधानसभा २०१९च्या निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा शपथविधी महाराष्ट्रातील राजकारणातला सर्वात मोठा धक्का होता. आता याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती, असं फडणवीसांनी सांगितली असून यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाबाबत प्रसार माध्यमांसोबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘तिच भूमिका अजित पवारांनीही मांडली होती. मला एकट्याला कशाला दोष देतायत? माझ्या पक्षाचा निर्णय होता. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणतं होतो की, लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावत्रीशी, हे खरं ठरलं आहे,’ असं म्हणतं आंबेडकरांनी शरद पवारांना टोला लगावला.

फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते, तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवंय. त्यानंतर शरद पवारांसोबत चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.’

(हेही वाचा – फडणवीस हुशार; कुठे, काय बोलायचे चांगले जाणतात – अशोक चव्हाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.