शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवी हे घटनापीठापुढे युक्तीवाद करत आहेत. यावेळी त्यांनी सरकार कोसळण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा दावा केला. साळवी म्हणाले की, उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत होती. वेळ असतानाही उद्धव ठाकरे यांनी राजीनामा का दिला? तसेच, महाविकास आघाडीकडे बहुमतासाठी 288 पैकी 173 आमदार होते. त्यामुळे केवळ 16 आमदारांमुळे सरकार पडले, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सरकार कोसळण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असा साळवी यांनी युक्तीवाद केला.
( हेही वाचा: फडणवीस हुशार; कुठे, काय बोलायचे चांगले जाणतात – अशोक चव्हाण )
साळवी यांचा युक्तीवाद काय?
उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत होती. त्यांनी वेळेच्या आधीच राजीनामा का दिला? बहुमत सिद्ध न करता ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी मविआजवळ 288 पैकी 173 आमदार होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडले. त्यामुळे बंडखोर 16 आमदारांनी मविआला पाठिंबा दिला असता की नाही? हा मुद्दाच निरर्थक आहे. बंडखोर आमदारांमुळे सरकार पडलेले नाही, असा युक्तीवाद साळवी यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community