टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मायक्रो ब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म असलेल्या ट्वीटरचे मालक एलाॅन मस्क नेहमी चर्चेत असतात. ट्वीटरची मालकी एलाॅन मस्क यांच्याकडे आल्यापासून त्यांनी ट्वीटरमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. बुधवारी त्यांनी एक ट्वीट करत ट्वीटरच्या नव्या सीईओची घोषणा केली. त्यांनी काही फोटो ट्वीट केले आहेत, ट्वीटरचा नवा सीईओ आश्चर्यकारक आहे. त्यांनी एका श्वानाला ट्वीटरचा नवा सीईओ घोषित केले आहे.
जगातील दुस-या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलाॅन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे ट्वीटरचा नवा सीईओ हा माणूस नसून एक श्वान आहे. तो मस्कचा पाळीव कुत्रा फ्लोकी आहे. एलाॅन मस्क यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, त्यांचा कुत्रा फ्लोकी दुस-या माणसांपेक्षा चांगला आहे. दरम्यान, एलाॅन मस्क यांनी ट्वीटरला 44 बिलियन डाॅलर्समध्ये विकत घेतल्यानंतर त्याचे सीईओ होते आणि सीईओ बनल्यानंतर त्यांनी पराग अग्रवालासह अनेकांना दिलासा दिला होता.
And has 🔥🔥 style pic.twitter.com/9rcEtu9w1Z
— Elon Musk (@elonmusk) February 15, 2023
( हेही वाचा: कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू )
एलाॅन मस्क यांच्याकडून कुत्र्याचे कौतुक
सीईओ बनल्यानंतर एलाॅन मस्कने आपल्या कुत्र्याचे कौतुक केले आहे आणि सांगितले की, तो नंबर्समध्ये खूप चांगला आहे आणि त्याची शैलीदेखील आहे. एलाॅन मस्कच्या या ट्वीटला आतापर्यंत सुमारे 20 हजार लोकांनी लाईक केले असून 10.6 मिलियन व्ह्यूज झाले आहेत.
Join Our WhatsApp Community