महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष ‘बेस्ट बससेवा’; ‘या’ बसमधून करा प्रवास

137
शनिवार  १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्रीनिमित्त  मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली पूर्व) येथील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त  बसगाड्या सकाळी  १०.३० ते सायंकाळी ७.३० या  दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते पी.टी. उद्यान-शिवडी), बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) या तिन्ही मार्गांवर  सकाळी ७.०० ते सायं. ७.०० या वेळेत ६ अतिरिक्त बसेस चालवण्यात येतील, असे बेस्टने कळवले आहे. तरी भाविकांनी या अतिरिक्त बससेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.