दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा

164

राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत नि:शुल्क समुपदेशन मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

( हेही वाचा : महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष ‘बेस्ट बससेवा’; ‘या’ बसमधून करा प्रवास)

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा

२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची, तर २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक तणावाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाइन समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. ७३८७४००९७०, ८३०८७५५२४१, ९८३४९५१७५२, ८४२११५०५२८, ९४०४६८२७१६, ९३७३५४६२९९, ८९९९९२३२२९, ९३२१३१५९२८, ७३८७६४७९०२, ८७६७७५३०६९ या मोबाइल क्रमांकाद्वारे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांचे निःशुल्क समुपदेशन करण्यात येईल. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि प्रश्नपत्रिकेबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.