आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने खात्याने परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आम या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. याआधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते मग शिवजयंतीबाबत भेदभाव का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. याविरोधात काही संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अखेर आता पुरातत्व खात्याने शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; शिंदे गटाकडून होणार युक्तिवाद )
आग्रा किल्ल्यावर शिवजयंती
विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फॉंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अन्य कार्यक्रमांना परवानगी मग शिवजयंतीला का नाही?
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे ११ नोव्हेंबर २०२२ पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. आग्राच्या याच किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रम, अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासिक संबंध त्या किल्ल्याशी नाही, अशांनाही परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासिक संबंध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली, असा प्रश्न पाटील यांनी केला होता.
परंतु आता दिल्ली उच्च न्यायालयात शिवप्रेमींना भक्कम बाजू मांडल्याने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याला परवानगी मिळालेली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, या सोहळ्यात जर महाराष्ट्र सरकार सहआयोजक होणार असेल, तर कार्यक्रम घेण्याचा विचार करता येईल. पण जर पुरातत्व खात्याने परवानगी दिली नाही, तर याचिकाकर्त्यांना पुन्हा न्यायालयात दाद मागता येईल.
Join Our WhatsApp Community