महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार आहे.
( हेही वाचा : केंद्रीय मंत्री अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने घेणार बैठक )
दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी दिल्या जात होत्या. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने यावर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे ही दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने आता पेपरच्या नंतर दाह मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. यानुसार आता बोर्डाने परिपत्रक जारी करत निर्धारित वेळेनंतर परीक्षेदरम्यान १० मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.
दहावी – बारवी बोर्ड परीक्षांच्या वेळेत पुढीलप्रमाणे बदल…
- परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २
परीक्षेची सुधारित वेळ सकाळी ११ ते २.१० वाजेपर्यंत - परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत
परीक्षेची सुधारित वेळ सकाळी ११ ते दुपारी १.१० वाजेपर्यंत - परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
परीक्षेची सुधारित वेळ सकाळी ११ ते दुपारी १.४० वाजेपर्यंत
दुपारचे सत्र
- परीक्षेची सध्याची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६.१० वाजेपर्यंत - परीक्षेची सध्याची वेळी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ५.१० वाजेपर्यंत - परीक्षेची सध्याची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ५.४० वाजेपर्यंत