२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते, तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवंय. त्यानंतर शरद पवारांसोबत चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावरून सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य करून मोठं विधान केलं आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
एका मराठी खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांसोबत ४५ मिनिटांसाठी भेट झाली. त्या भेटीत काय झालं? हे माहित झालं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की, अजित पवारांनी शरद पवारांना माहित नाही किंवा न सांगता अंधारात ठेवून देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथविधी घेतात हे पटण्यासारखं नाही आणि पचण्यासारखं नाही. पण अजित पवार असं काही शरद पवारांना विचारल्याशिवाय करतील याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. ही घटना घडली, पण ती घटना घडल्यानंतर कदाचित पवारांना असं वाटलं असेल की, पावसात भिजून जे कमावलं होत त्या घटनेनं हे जाऊ शकतं. म्हणून पवारांनी अजित पवारांना माघारी बोलवलं.
पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अजित पवार पिंपरीत असताना गद्दार पुन्हा निवडून येत नाही असं म्हणाले होते. तर अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथविधी घेतला असेल तर ते पण गद्दारच आहेत. आणि अजित पवार खरंच गद्दार असतील तर शरद पवारांनी माफी देऊन उपमुख्यमंत्री पदावर नेमलंच नसतं ना? याचा अर्थ शरद पवारांना शपथविधीबाबत माहित होत.
(हेही वाचा – शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधीच होऊ शकत नाही; फडणवीसांनंतर आणखी एका नेत्याचा आरोप)
Join Our WhatsApp Community