सावरकर आर्चरी अकादमीचे घवघवीत यश; बोरिवली क्रीडा महोत्सवात १६ सुवर्ण पदके

143

बोरिवली क्रीडा महोत्सवामध्ये राजामाता जिजाऊ उद्यान वझिरा, बोरिवली पश्चिम येथे १२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी आयोजित केलेल्या तिरंदाजी स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर आर्चरी अकादमीच्या तिरंदाजांनी घवघवीत यश मिळवले आहे. यात १६ सुवर्णपदके, ५ रजत पदके, ११ कांस्य पदके अशी एकंदर ३२ पदके तिरंदाजांनी पटकावली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व तिरंदाजांचे आणि तिरंदाजी अकादमीची यशाबद्दल प्रशंसा केली आहे. या स्पर्धेमध्ये यशस्वी तिरंदाजांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

(हेही वाचा Shiv jayanti 2023: योगी सरकारच्या काळात शिवजयंतीच्या यात्रेत पोलिसांचा खोडा)

१० वर्षांखालील गटात

अदवय अनिकेत सावंत (दोन सुवर्ण), देवांश विवेक मोहिते (दोन कांस्य), शिरिन आशिश पाटील (दोन सुवर्ण)

१२ वर्षांखालील गटात

स्वरा संदेश परब (एक रजत), सोनम शेलार (एक सुवर्ण), वीर पद्मिनी नायक (एक सुवर्ण, एक कांस्य)

१४ वर्षाखालील गटात

संकल्प जाधव (एक सुवर्ण, एक कांस्य), प्रतीक राज (एक कांस्य)

१७ वर्षांखालील गटात

दर्श विजय झारे (दोन सुवर्ण), शर्मिका घाडीगावकर ( दोन सुवर्ण)

खुला गट

कावेरी नायकर (दोन रजत), श्वेता तिवारी (एक कांस्य), नेहा टिकम (एक कांस्य)

सावरकर स्मारकाच्या आर्चरी अकादमीने या स्पर्धेत सर्वात अधिक सुवर्ण पदके पटकावली आहेत, अशी माहिती अकादमीचे प्रशिक्षक स्वप्निल परब यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.