कॅनडातील मिसिसॉगा येथे एका हिंदू मंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना समोर आली आहे. यावर कॅनडाच्या टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने याचा निषेध केला असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी कॅनडा सरकारकडे केली आहे.
भारतीय राजदुताकडून नाराजी व्यक्त
वाणिज्य दूतावासाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मिसिसॉगा येथील राम मंदिराची विटंबना आणि त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही कॅनडा सरकारकडे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कॅनडात हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यात कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरात भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. त्यामुळे हिंदू समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ब्रॅम्प्टनमधील गौरी शंकर मंदिराच्या विद्रुपीकरणामुळे कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत भारतीय राजदुताने यावर नाराजी व्यक्त केली होती.
(हेही वाचा गृहकर्जाचे हप्ते थकले तरी काळजी करू नका; कारण…)
खलिस्तान समर्थक आरोपी
भारतीय राजदुताने हे प्रकरण कॅनडा सरकारकडे मांडले होते. ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनीही या घटनेचा निषेध केला. अशा घृणास्पद कृत्याला आपल्या शहरात आणि देशात स्थान नाही. महापौरांनी या घटनेबाबत शहर पोलीस प्रमुखांशी चर्चाही केली. सप्टेंबर 2022 रोजी कॅनडात स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करून भारतविरोधी घोषणा लिहिण्याचीही घटना घडली होती. या घटनेत खलिस्तान समर्थक आरोपी होते. त्याच वेळी, जुलै 2022 मध्ये ग्रेटर टोरंटो भागातील रिचमंड हिल नावाच्या ठिकाणी हिंदू मंदिरात स्थापित केलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली.
Join Our WhatsApp Community